दारू विकणाऱ्या व पिणाऱ्या चार-सहा टक्के लोकांसाठी एवढी उठाठेव कशाला? त्यांना कायद्याचा धाक पुरेसा आहे!
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटवण्यासंबंधी उलटसुलट बातम्या वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांवर दिसत आहेत. दारू कोणाला पाहिजे? एकूण लोकसंख्येपैकी ५० टक्के महिलांना दारू नकोच आहे. पन्नास टक्के पुरुष लोकसंख्येपैकी कोणत्याच बालकाने दारूबंदी हटवा म्हणून मागणी केलेली नाही. जे दारू पित नाहीत त्यांनीही मागणी केलेली नाही. ज्येष्ठ नागरिक आधीच बीपी, शुगर, लकवा या बिमाऱ्या सांभाळत उतारवयात दारूचा शौक करायला तयार नाहीत.......